सिंधुदुर्गातील उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिपी विमानतळावर आज मनसेने अनोखे आंदोलन केले.हाताने कागदी विमाने उडवून मनसेच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी शासनाचा निषेध नोंदवला. चिपी विमानतळाच्या उदघाटनाच्या तारखा अनेकदा सत्ताधारी यांच्याकडून देण्यात आल्या.पूर्वीचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यापासून सुरू असलेला हा उदघाटनाचा कार्यक्रम सध्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकिर्दीत सुद्धा अजून ही पेंडिंग आहे. रोज नवनवीन तारखा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात येतात